नमस्कार मी श्री.संतोष कृष्णा पोकळे गेली आठ वर्षापासून नरेंद्र होमिओपॅथिक क्लिनिक मध्ये आदरणीय श्री. संदीप माणिक गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाने होमिओपॅथिक मेडीसिन घेत आहे, मला स्किनची समस्या होती जी ६ महिन्यात कव्हर झाली, आधी मी इतर स्किन स्पेशालिस्ट कडे या त्रासाचे निदान करण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही, त्यात माझा बराच वेळ आणि पैसा वाया गेला, जेव्हा पासून मी संदीप सर यांना भेटलो, त्यांनी माझ्यात खूप मोठा आत्मविश्वास भरला, माझ्या मनातली भीती काढून टाकली.
मला मिळालेल्या रिझल्ट नंतर मी माझ्या स्वतःच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची वेगवेगळ्या हेल्थ समस्येसाठी त्यांच्याकडेच ट्रीटमेंट घेतली आहे, माझी दोन्ही मुले सारखी आजारी पडायची, त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सरांनी चांगली औषधे देवून मुलांची समस्या सोडवली, माझ्या पत्नीला आमच्या लग्नानंतर साधारण ८ ते १० वेळा टायफाईड झालेला तिचीही समस्या सुटली, भावाला किडनी स्टोन चा प्रॉब्लेम होता तोही सॉल्व झाला, असे अनेक पेशंट गेले आणि त्यांना त्यांच्या आजार पनातून सुटका मिळाली,
श्री.संदीप गायकवाड सरांच्या रूपाने आम्हला तर देवमाणूस मिळाला, माणसाला जीवनात जर आनंद घ्यायचा असेल तर त्याची प्रकृती स्वास्थ्य व्यवस्थित असेल तर तो जीवनाचा आनंद घेवू शकतो अन्यथा कितीही पैसा असला तरी माणूस त्याचा उपभोग घेवू शकत नाही.
प्रत्येक पेशंट मध्ये आत्मविश्वास भरून काहीच काळजी करू नका मी आहे ना, सगळं काही ठीक होवून जाईल असे सरांचे शब्द कानावर पडले की पेशंट अर्धा बरा होवून घरी येतो.
डॉक्टर श्री.संदीप गायकवाड सरांचे मनापासून आभार.
आपलाच कृपाअभिलाशी
श्री.संतोष पोकळे.